युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : शिक्षण साऱ्यात मोठी दवा आहे, उच्च शिक्षण घेतल पाहिजे, माणूस जागृत झाला पाहिजे, देवान अपल्याला अक्कल दिली, तिचा वापर केला पाहिजे, नाहीतर तुका म्हणे हेला अन पाणी वाहता वाहता मेला. बोला… गोपाला… गोपाला… देव की नंदन गोपाला. असे किर्तन सादर करत संत गाडगेबाबा यांच्या वेषात निर्मलग्राम चा संदेश दिला जात होता. १ आक्टोंबर ला स्वच्छतेसाठी सगळेजण एकत्र येऊन महात्मा गांधीजींना स्वच्छांजली वाहू यात… हा राष्ट्रिय संदेश दिला जात होता. या संदेशाचे स्वागत केले जात होते. प्रसंग होता… श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक.
शांततेत निघाली अनोखी मिरवणूक
कवठे येमाई ( ता. शिरूर ) चंदननगर येथील पिरसाहेब गणेश मित्र मंडळ यांनी स्वच्छतेचा संदेश घेऊन विसर्जन मिरवणूकीत संत गाडगेबाबा चा जीवंत देखावा सादर केला होता. या त्यांच्या सादरीकरणाने विसर्जन मिरवणूकीचे आकर्षण ठरले. या गणेश मंडळाने डीजे, ताशा, ढोल या वाद्यावर बंदी ठेवण्यात आली होती. (Shirur News) या मिरवणूकीत तरूणाईने डान्स करणे देखील टाळले. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा व माणसात देव पहाण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. त्यांची ही विशेष विसर्जन मिरवणूक मंडळाचा मुख्य उद्देश एकोपा वाढीस लागावा हाच होता. शांततेत निघालेली ही मिरवणूक ग्रामस्थांसाठी अनोखी होती.
परस्परांविषयी मनात प्रेम निर्माण व्हावे लोकं एकत्र यावेत म्हणून हा उत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला पण आज त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त झालेले आपण पहात आहोत. (Shirur News) त्यातून १ आक्टोंबर ला स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तो संदेश लोकांपर्यत पोहचावा. हा उद्देश ठेवून हा जीवंत देखावा सादर केल्याचे राजू पोपळघट यांनी सांगितले.
या जिवंत देखाव्यात राजू पोपळघट, पप्पू पठाण, कैलास कुळके, साहेबराव दळवी, संपत थोरात, पवन रोकडे, भास्कर ढोरके, गणेश दळवी, अतुल कुळके, देवराम मसगुडे या मंडळाच्या सभासदांनी सहभाग घेतला होता. (Shirur News) त्याचबरोबर या मंडळाच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात भाग घेतला होता.
दरम्यान, , फ्रेंडसिप व नवज्योत मित्र मंडळांची देखील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडली. यासाठी पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘घोडगंगा’च्या कामगारांचा संप तब्बल ९० दिवसांनंतर मागे
Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध