Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कवठे येमाई येथील पिरसाहेब गणेश मित्र मंडळाने स्वच्छतेचा संदेश देत बाप्पाला दिला निरोप

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 30 September 2023, 11:53

युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर  : शिक्षण साऱ्यात मोठी दवा आहे, उच्च शिक्षण घेतल पाहिजे, माणूस जागृत झाला पाहिजे, देवान अपल्याला अक्कल दिली, तिचा वापर केला पाहिजे, नाहीतर तुका म्हणे हेला अन पाणी वाहता वाहता मेला. बोला… गोपाला… गोपाला… देव की नंदन गोपाला. असे किर्तन सादर करत संत गाडगेबाबा यांच्या वेषात निर्मलग्राम चा संदेश दिला जात होता. १ आक्टोंबर ला स्वच्छतेसाठी सगळेजण एकत्र येऊन महात्मा गांधीजींना स्वच्छांजली वाहू यात… हा राष्ट्रिय संदेश दिला जात होता. या संदेशाचे स्वागत केले जात होते. प्रसंग होता… श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

शांततेत निघाली अनोखी मिरवणूक 

कवठे येमाई ( ता. शिरूर ) चंदननगर येथील पिरसाहेब गणेश मित्र मंडळ यांनी स्वच्छतेचा संदेश घेऊन विसर्जन मिरवणूकीत संत गाडगेबाबा चा जीवंत देखावा सादर केला होता. या त्यांच्या सादरीकरणाने विसर्जन मिरवणूकीचे आकर्षण ठरले. या गणेश मंडळाने डीजे, ताशा, ढोल या वाद्यावर बंदी ठेवण्यात आली होती. (Shirur News) या मिरवणूकीत तरूणाईने डान्स करणे देखील टाळले. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा व माणसात देव पहाण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. त्यांची ही विशेष विसर्जन मिरवणूक मंडळाचा मुख्य उद्देश एकोपा वाढीस लागावा हाच होता. शांततेत निघालेली ही मिरवणूक ग्रामस्थांसाठी अनोखी होती.

परस्परांविषयी मनात प्रेम निर्माण व्हावे लोकं एकत्र यावेत म्हणून हा उत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला पण आज त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त झालेले आपण पहात आहोत. (Shirur News) त्यातून १ आक्टोंबर ला स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तो संदेश लोकांपर्यत पोहचावा. हा उद्देश ठेवून हा जीवंत देखावा सादर केल्याचे राजू पोपळघट यांनी सांगितले.

या जिवंत देखाव्यात राजू पोपळघट, पप्पू पठाण, कैलास कुळके, साहेबराव दळवी, संपत थोरात, पवन रोकडे, भास्कर ढोरके, गणेश दळवी, अतुल कुळके, देवराम मसगुडे या मंडळाच्या सभासदांनी सहभाग घेतला होता. (Shirur News) त्याचबरोबर या मंडळाच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात भाग घेतला होता.

दरम्यान, , फ्रेंडसिप व नवज्योत मित्र मंडळांची देखील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडली. यासाठी पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : ‘घोडगंगा’ सहकारी साखर कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पाचे लवकरच विस्तारीकरण होणार – अध्यक्ष ऋषिराज पवार..

Shirur News : ‘घोडगंगा’च्या कामगारांचा संप तब्बल ९० दिवसांनंतर मागे

Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.