Shirur News : तळेगाव ढमढेरे : मुखई (ता.शिरूर) येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळेच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सॉफ्टबॉल स्पर्धेत सोलापूरच्या संघाला पराभूत करुन यश संपादन केले. या यशामुळे सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे संस्थेच्या वतीने अभिनंंदन
शालेय क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धेचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेत यश मिळवल्यानंतर काही खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली होती. (Shirur News) या संघामध्ये संग्राम अंधारे, अजित थोरात, कुमार आंधळे, दर्शन भालेकर, ओंकार घोडे,प्रेम कोळपे, राजवर्धन शिरसाट, गणेश काळे, वेदांत वनवे, अजय दगडे, सचिन वडते, यश पवार, प्रसाद हाके, साहिल चाटे, साहिल साबळे, प्रकाश खैरे या खेळाडूंनी सहभाग घेत सोलापूरच्या संघाला ६-१ ने पराभूत केले.
या संघाची सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली. तर यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे,कार्यकारी अधिकारी मंगेश मोरे यांनी अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सणसवाडीच्या मनस्वी पांढरेची ब्रांझ पदकाला गवसणी
Shirur News : खोलीकरणाने जलस्त्रोत बळकट होणार – सुदाम इचके