योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : तरुणांनी हवाई दल, नौदल व स्थल सेना या लष्करातील प्रमुख संस्थांमध्ये भरती झाले पाहिजे. सैन्याकडे केवळ करिअर या दृष्टीने न पाहता, देशसेवा करण्याची सुवर्णसंधी म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन प्रा. तुषार वाघमारे यांनी केले.
कवठे येमाई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील राजमाता प्रतिष्ठानतर्फे न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स महाविद्यालयात ‘सैन्यात अधिकारी कसे व्हावे’ या विषयावर मंगळवारी (ता. २६) एनडीए विंग, एन. एस. बी. मिलिटरी स्कूल तसेच फुलगाव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. तुषार वाघमारे यांचे करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (Shirur News) त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. वाघमारे बोलत होते.
या वेळी प्रा. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना, लष्करात जाताना कोणत्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या असतात, पूर्वतयारी करताना किती मेहनत करायची, त्यामधील परीक्षा कशा असतात, भरती होताना वजन, वय, उंची किती असावी, कोणती इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर लष्करात कोणत्या संधी मिळतात, लष्करात अधिकारी कशा प्रकारे होता येते, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. (Shirur News) या वेळी त्यांनी ‘अग्निवीर’ या पदाबद्दल माहिती सांगितली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशाली रत्नपारखी, रंजना कुंभार, रंजना जाधव, अश्विनी गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.(Shirur News) या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, ए. बी. मोमीन, ए. व्ही. थोरात, एम. एस. करंजकर, एम. एम. दरवडे, एस. डी. मुंजावडे, डी. पी. गायकवाड, एस. एम. गायकवाड, एस. एल. घोडे, टी. बी. गाडेकर, एस. एम. दाभाडे, ए. पी. गोडे, एच. पी. कड्डे, एस. एस. नेहेरे, शिंदे मामा व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : खार ओढ्यात पाय घसरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला
Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गणेश मंडळांचे कार्य उल्लेखनीय : पूर्वा वळसे पाटील