योगेश पडवळ
Shirur News : पाबळ, (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मुंडे यांनी दिली.
४० हजारांचा मुद्देमाल जप्त..
संकेत संतोष महामुनी, प्रथमेश संतोष नवले (रा. दोघही कारेगाव, शिरूर) व सुयश कोल्हे (रा. माटेवाडी, निमोने) अशी ताब्यात केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Shirur News ) त्यांच्याकडून पोलिसांनी १ देशी गावठी कट्टा, २ जिवंत काडतूस, वेगवेगळ्या प्रकारचे चार पायघन कोयते, असा तब्बल ३८ हजार ५०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतीत एच पी पेट्रोल पंपा समोरील व कारेगाव हद्दीतील बच्चा नवले यांच्या रूम मधी पोलिसांनी आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Shirur News ) आरोपी विरुद्ध शस्त्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी रांजणगाव एमआयडीसी मध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Shirur News ) पोलीस शिपाई विजय गजानन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुंडे, हवालदार सरजिने पुढील तपास करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सरपण आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा विनयभंग ; तरुणावर गुन्हा दाखल..