Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahableshwar News : वाघाची शिकार करून कातडे व नखांची तस्करी करण्याच्या तयारीतील तिघे जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 10:30

Mahableshwar News : महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याचे कातडे व वाघ नखे यांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तिघांना सापळा रचून मुंबई पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किंमतीचे वाघाचे कातडे व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला. या तिघांवर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा लाखांचा मुद्देमालही जप्त

पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सुरज लक्ष्मण कारंडे (वय 30 रा. बिरवाडी, ता.महाबळेश्वर), मोहसीन नजीर जुंद्रे (वय 35, रा. रांजणवाडी महाबळेश्वर) व मंजुर मुस्तफा मानकर (वय 36 रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, महाबळेश्वर येथील काही लोक वाघाच्या कातड्याची व त्याच्या वाघ नखांची तस्करी करण्यासाठी एलआयसी मैदान बोरीवली पश्चिम येथे येणार आहेत. (Mahableshwar News) बोंबे यांनी ही माहिती आपले वरिष्ठ अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन शिंदे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना दिली. या दोन्ही अधिकारी यांनी ही माहिती पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांना दिली. पोलिस उपायुक्त बन्सल यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

वरिष्ठांकडून आदेश मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचला. वाघाचे कातडे व नखे विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शिताफीने जेरबंद केले. (Mahableshwar News) या तीन आरोपींकडून वाघाचे सोलून काढलेले काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले 114 सेंटीमीटर लांब व 108 सेंटीमीटर रूंद वाघाचे कातडे त्यासोबत 12 वाघनखे असा साधारण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

 

सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यातील सपोनि भालचंद्र शिंदे, पोउनि अखिलेश बोंबे, पोलिस हवालदार प्रविण जोपळे, संदीप परीट, पोलिस शिपाई प्रशांत हुबळे व गणेश शेरमळे यांनी सापळा रचून आरोपिंना जेरबंद करण्यात मोठी महत्वाची कामगिरी बजावली.

महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघांचे अस्तित्व

महाबळेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. परंतु, पट्टेरी वाघ दिसत नाही. वन विभागाचे अधिकारी देखील आपल्या जंगलात पट्टेरी वाघ नाहीत, असे सांगतात. (Mahableshwar News) परंतु या शिकार प्रकरणाने महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत, हे सिध्द होत आहेत. यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाच्या शिवारात ब्लॅक पँथर काही लोकांनी पाहिला होता. परंतु, त्यानंतर तो पँथर देखील पुन्हा दिसला नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : वारजे माळवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत ; शेखर खवळेवर स्थानबद्धतेची कारवाई..

Satara News : वाघाची शिकार करून कातडे व नखांची तस्करी करण्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दहा लाखांचा मुद्देमालही जप्त

Mumbai News : बहिण-भावाच्या नात्याचे बंध उलगडले; ‘तो’ व्हिडीओ पाहून सुप्रियाताईंना अश्रू अनावर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22

बारामतीतील महिलेवर 2 वर्ष बलात्कार; 17 वर्षीय मुलीचेही फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 9:08

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40
Next Post

Shirur News : रांजणगावात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp