Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिस चौकीसमोर महिलेचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; टाकळी हाजी परिसरात खळबळ

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 29 October 2026, 20:59

शिरूर: टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील पोलिस चौकीसमोर एका महिलेने बुधवारी (दि.२८) सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून महिलेला उपचारासाठी शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे टाकळी हाजी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका गुन्ह्याप्रकरणी संबंधित महिलेला तीन महिने कारावासात राहावे लागले होते. या कालावधीत तिच्या घरी कोणीही नसल्याने शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडून घरातील सामानाची नासधूस केली, तसेच भांडीकुंडी चोरून नेल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत तिने टाकळी हाजी पोलिस चौकीत अर्ज दिला होता. याचदरम्यान महिलेच्या तक्रारीची खातरजमा आणि चौकशी सुरू असतानाच तिने पोलिस चौकीसमोर विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा अर्ज प्राप्त झाला असून, त्यानुसार चौकशी सुरू होती. उपचारानंतर तिची रीतसर फिर्याद नोंदवून पुढील कार्यवाही केली जाईल.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…..

दरम्यान, संबंधित महिला गेल्या काही दिवसांपासून तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत वारंवार चकरा मारत होती. मात्र, तिच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली न गेल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत टाकळी हाजी पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत यांनी महिलेचा जबाब नोंदविल्यानंतरच सविस्तर स्पष्टीकरण देता येईल, असे सांगितले. महिलेच्या आरोपांची सत्यता, तक्रारीवर झालेली कार्यवाही आणि या घटनेमागील नेमकी कारणे चौकशीनंतर स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07
Next Post

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचे १६ नोव्हेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे थेट आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp