युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा क्रांतिकारी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्रशासकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. असे आवाहन सेवा निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी केले. (‘Government at Your Door’ initiative at Takli Haji; 1 thousand 226 citizens benefited from the initiative)
शेवटच्या घटकापर्यत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी उपक्रम
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे शासनाच्या निर्दशनानुसार शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमात १२२६ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या. (Shirur News) तालुक्यातील सर्व मंडळ भागात तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार प्रकाश मुसळे, पुरवठा विभागाचे निलेश घोडके, मंडळ अधिकारी एकनाथ ढाके, कामगार तलाठी कमलीवाले, ग्रामसेवक आर. खराडे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, सरपंच अरूणा घोडे, माजी सरपंच दामुशेठ घोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभाग ८५, पशुवैद्यकिय विभाग २०, महावितारण ९, आधार सेतू विभाग ६०, महसूल विभाग १४७, वनिविभाग १७, कृषी विभाग १०२, सेतू विभाग २९, पंचायत समिती कृषी विभाग ५५, पोलिस प्रशासन २३, भुमी अभिलेख ११, ग्रामपंचायत विभाग ११०, निवडणूक विभाग ४९९, असे सुमारे १२२६ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.(Shirur News)
प्रभाकर गावडे म्हणाले की, सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी सर्व प्रशासकिय अधिकार्यांनी प्रामाणिक काम केले पाहिजे. आज प्रत्येक लाभार्थ्य़ाच्या चेहऱ्यावरील आनंद पहाताना आम्हाला समाधान वाटत आहे. सरकारी योजना अधिकार्यांनी लोकांसाठी राबवाव्यात.(Shirur News) आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान राखून काम करावे.
राजेंद्र गावडे म्हणाले की, अनेकदा जनतेला योजनांची माहिती नसते. त्या काळात भेटीसाठी अधिकारी उपलब्ध होत नाहीत. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो.(Shirur News) त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन, गतीमान व्यवस्था होण्यासाठी ही पद्धती चांगली आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या माध्यमातून देखील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन सर्व सामान्य जनतेची कामे केलेली आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : धरण, कालवे, बंधारे यांचे रक्षण करा; शेतीसाठी दुष्काळात मुख्य साधन
Shirur News : लहान भावावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बाप लेकाला ७ वर्षाची सक्तमजुरी