युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : ‘या घरावरून, त्या घरावर, काही दुकानात तर झाडावर’ उच्छाद मांडणारी माकडं, कुत्र्याचं भुंकणं अन् मुलांना कुतूहल वाटणारी दोन वानरं…ग्रामस्थांचा मिरच्या, शेंगा, चिकू फराळाचा त्यांना पाहुणचार. सध्या कवठे येमाई (ता. शिरूर) येथे हे चित्र पाहायला मिळत आहे. या गावात ही वानरं मोकाटपणे हिंडताना दिसू लागल्याने मुलांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
उन्हाळ्यात पाणी मिळाले नाही की ही वानरं मानवी वस्तीकडे धाव घेतात. उन्हाच्या कडाक्याने पानझड झालेल्या वृक्षांखाली सावलीच नसल्याने प्राण्यांचा आश्रयही नष्ट झालेला असतो. त्यामुळे ही वानरं आश्रय शोधत येत असतात. पण सध्या जोरदार पाऊस झाला आहे.(Shirur News) पाणी सगळीकडे मिळू लागले आहे. तरीदेखील गावांकडे वानरं दिसू लागली आहेत. लांब शेपटी व काळे तोंड असणारी ही माकडे सध्या घराघरांवर फिरताना, उड्या मारताना दिसू लागले आहेत.
डोंगर माथ्याकडील वानरं गावाकडे कशी हा चर्चेचा विषय
शिरूर तालुक्याच्या कवठे येमाई येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. (Shirur News) त्यातून चिंचाची झाडे बहरली आहेत. त्यामुळे चिंचा खायला तसेच चिंचेचा पाला खायला ही वानरं आली असावीत, अशी चर्चा होत आहे. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात जंगलात, डोंगर माथ्यावर असणारी वानरं किंवा माकडं या परिसरात नेहमीच येतात. पण सध्या तसे वातावरण नसल्याने ही डोंगर माथ्याकडील वानरं गावाकडे कशी आली हा चर्चेचा विषय ठरला आहे.
भटकंती करताना वानरं मानवी वस्तीकडे…
‘चिंचेच्या शोधात किंवा भटकंती करताना चूकून ते मानवी वस्तीकडे ही वानरं आलेली आहेत. त्यांना कोणीही त्रास देऊ नये. असे काही केल्यास ते तुमच्यावर प्रतिहल्ला करू शकतात. (Shirur News) शक्यतो मोठा आवाज केला तरी ही वानरं निघून जातात. वाघाळे (ता. शिरूर) येथे देखील तीन वानरं आल्याचे पाहावयास मिळाल्याचे वनविभागाचे वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : विठ्ठलवाडीच्या उपसरपंचपदी प्रतिभा वाळके यांची बिनविरोध निवड
Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे – मिट्टूशेठ बाफना
Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा