Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कवठे येमाई गावात वानरांचा मुक्त संचार अन् ग्रामस्थांकडून पाहुणचार; चर्चा तर होणारच…!

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 2 October 2023, 18:00

युनूस तांबोळी

Shirur News : शिरूर : ‘या घरावरून, त्या घरावर, काही दुकानात तर झाडावर’ उच्छाद मांडणारी माकडं, कुत्र्याचं भुंकणं अन् मुलांना कुतूहल वाटणारी दोन वानरं…ग्रामस्थांचा मिरच्या, शेंगा, चिकू फराळाचा त्यांना पाहुणचार. सध्या कवठे येमाई (ता. शिरूर) येथे हे चित्र पाहायला मिळत आहे. या गावात ही वानरं मोकाटपणे हिंडताना दिसू लागल्याने मुलांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

उन्हाळ्यात पाणी मिळाले नाही की ही वानरं मानवी वस्तीकडे धाव घेतात. उन्हाच्या कडाक्‍याने पानझड झालेल्या वृक्षांखाली सावलीच नसल्याने प्राण्यांचा आश्रयही नष्ट झालेला असतो. त्यामुळे ही वानरं आश्रय शोधत येत असतात. पण सध्या जोरदार पाऊस झाला आहे.(Shirur News)  पाणी सगळीकडे मिळू लागले आहे. तरीदेखील गावांकडे वानरं दिसू लागली आहेत. लांब शेपटी व काळे तोंड असणारी ही माकडे सध्या घराघरांवर फिरताना, उड्या मारताना दिसू लागले आहेत.

डोंगर माथ्याकडील वानरं गावाकडे कशी हा चर्चेचा विषय

शिरूर तालुक्याच्या कवठे येमाई येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. (Shirur News) त्यातून चिंचाची झाडे बहरली आहेत. त्यामुळे चिंचा खायला तसेच चिंचेचा पाला खायला ही वानरं आली असावीत, अशी चर्चा होत आहे. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात जंगलात, डोंगर माथ्यावर असणारी वानरं किंवा माकडं या परिसरात नेहमीच येतात. पण सध्या तसे वातावरण नसल्याने ही डोंगर माथ्याकडील वानरं गावाकडे कशी आली हा चर्चेचा विषय ठरला आहे.

भटकंती करताना वानरं मानवी वस्तीकडे…

‘चिंचेच्या शोधात किंवा भटकंती करताना चूकून ते मानवी वस्तीकडे ही वानरं आलेली आहेत. त्यांना कोणीही त्रास देऊ नये. असे काही केल्यास ते तुमच्यावर प्रतिहल्ला करू शकतात. (Shirur News) शक्यतो मोठा आवाज केला तरी ही वानरं निघून जातात. वाघाळे (ता. शिरूर) येथे देखील तीन वानरं आल्याचे पाहावयास मिळाल्याचे वनविभागाचे वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी म्हटले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : विठ्ठलवाडीच्या उपसरपंचपदी प्रतिभा वाळके यांची बिनविरोध निवड

Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे – मिट्टूशेठ बाफना

Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

Pachgani News : आंब्रळ येथील टेबललँड परिसरात स्वच्छता मोहीम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.