युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर, (पुणे) : हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभा धरण) आज ९१.२४ टक्के भरले असून, असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे धरण शंभर टक्के भरणार आहे. डिंभा धरणातून उजव्या कालव्याला १५० क्युसेसने पाणी सोडल्याने आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्या तरी आंबेगाव, शिरूर या परिसरात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आंबेगाव, शिरूर या परिसरात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
जून महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने आंबेगाव, शिरूर या परिसरात पेरण्या रखडल्या आहेत. थोड्याशा रिमझिम पावसावर काही ठिकाणी ओल धरून खरिपातील बाजरीची पेरणी केली आहे. यावर्षी मात्र कडधान्य पेरणी झाली नसल्याने कडधान्य क्षेत्रच कमी झाल्याचे दिसून येत आहे. (Shirur News) डिंभा धरण क्षेत्रात पाऊस पडून डाव्या-उजव्या कालव्याद्वारे पाणी मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी ऊस, बाजरीची पेरणी केली आहे. त्यातून कालव्याद्वारे पाणी मिळाल्यास या पिकांना जीवदान मिळणार आहे. डिंभा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी या भागातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्याची कारवाई व्हावी, याबाबत सहकारमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंता यांना पत्र देऊन सुचविले होते. त्यानंतर पाटबंधारे विभागाने उजव्या कालव्यातून १५० क्युसेसने पाणी सोडले. त्यामुळे आंबेगाव व शिरूर या गावांना त्याचा फायदा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिली होती. त्यावेळी धरण ७० टक्क्यांपर्यंत भरेल, असे वाटत होते. मात्र, सध्या धरण क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी (ता. २७) सकाळी सहा वाजेपर्यंत या धरणात ९१.२४ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे. (Shirur News) असाच पाऊस सुरू राहिला तर लवकरच शंभर टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उजव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करावे, पाणी वाया जाणार नाही, असे नियोजन पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांना पाणी देताना झाले पाहिजे. कालव्यालगत काही भागांत रस्त्यांवर पाणी सोडून दिले जाते. (Shirur News) त्यासाठी ठोस कारवाई करावी. पाणी मिळाल्यावर पाणीपट्टी भरून पाटबंधारे खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शेरखान शेख… पशु-पक्ष्यांची भाषा जाणणारा शिरूरचा अवलिया!
Shirur News : बिबट्या-मानव संघर्षातून होणारे अपघात टळणार… की फक्त राजकारण होणार?
Shirur News : यात्रा-जत्रांमधून दिसणारी लोकनाट्य तमाशा ही शाश्वत अन् जिवंत कला