Shirur News : शिरूर : सनईच्या सुरात ढोल ताशाच्या तालावर ग्यानबा तुकाराम…चा संगीत गजर, त्या पाठोपाठ वारकरी सांप्रदायीतील भजनी मंडळ टोपी, धोतर अन नेहरू या पारंपारीक वेषभुषेत मृदुंगाच्या तालावर हातातील टाळांचा गजर करत जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष सुरू होता. त्यातून डोक्यावर कलश आणि पारंपारिक संस्कृती मधील वेशभुषा करणारी महिला फुगड्या घालून विठ्ठलाचा जयघोष करत होती. त्यातून कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील गावातून निघालेला हा कलशरोहन मिरवणूक सोहळ्याला रंगत चढली होती.
कवठे येमाई येथे मुर्तीस्थापना
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे वागदरे, वाळूंज वस्तीवर विठ्ठल, रुख्मिणी, श्री गणेश, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मुर्ती स्थापना समारंभ योजीत करण्यात आला होता. (Shirur News) यासाठी गावातून सवाद्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भागवताचार्य मोहन महाराज सानप यांची किर्तनसेवा आयोजीत करण्यात आली होती. यासाठी वाळुंज, वागदरे, गावडे, पडवळ, पोखरकर, या जनसुमदयाने भाग घेतला आहे.(Shirur News) या कार्यक्रमात पारायण, हरिभजन व हरीकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवार ( ता. ४ ) शंकर महाराज पांचाळ यांच्या हस्ते कलशारोहन व मुर्ती स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये अनोखे रक्षाबंधन
Shirur News : गहाळ झालेले मोबाईल शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधन सणाच्या दिवशी नागरिकांना परत