युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यात व परिसरात वेगवेगळ्या माध्यमातून आदिवासी, ठाकर समाजात कार्य करणाऱ्या त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणाऱ्या तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांना ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (Chief Minister Eknath Shinde Gaurav Award to Vaishali Chavan, President of Tejaswini Foundation)
आदिवासी ठाकर समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव
शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने माजी खासदार आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजीत केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात या सन्मानाचे वितरण करण्यात आले. (Shirur News ) शिरूर तालुक्यात अचानक लागलेल्या आगीत कुटूंब बरबाद झाले. यावेळी चव्हाण यांनी तत्काळ भेट देऊन गृह उपयोगी वस्तू व कपडे भेट देत या कुटूंबांचे सांत्वन केले होते.
शिरसगाव काटा, आमदाबाद, जांबूत येथील जळीत घटनेत त्यांनी दाखविलेले तत्पर कार्य उल्लेखनिय आहे. आदिवासी व ठाकर समाजातील महिलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे कार्य मोलाचे ठरत आहे. त्यातून शिक्षणापासून दूर राहणाऱ्या या मुलांना अधिक मदत होत आहे. वेळप्रसंगी या मुलांच्या आरोग्यासाठी ते वेगवेगळे शिबीर राबवित असतात. त्यातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे. (Shirur News ) नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी काही ज्येष्ष्ठ महिलांना मदत केली आहे. विटभट्टी कामगार अथवा मोलमजूरी करणाऱ्या स्त्रिया त्यांच्याकडे नेहमी मदतीसाठी येत असतात.
महिलांच्या वेगवेगळ्या समस्या ओळखून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढत त्यांना समोपदेश त्या करत असतात. त्यातून अनेक महिला एकत्रीत येऊन तेजस्विनी फाऊंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाते. किशोरवयीन मुलींसाठी वाईट व चांगला स्पर्श या बाबत नेहमीच मार्गदर्शन करतात. (Shirur News ) त्यातून मुलींच्या शरीरात होणारे बदल या बाबत आईने मुलीशी नाते कसे ठेवावे या बाबत व्याख्यान देत असतात. पारधी समाजातील मुलीच्या होओठावर शस्त्रक्रिया करून त्यानी तिच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळे सण व उत्साहाच्या काळात अधिवासी व ठाकर महिलांना एकत्रीत आणून त्यांना मदत करण्याकडे त्यांचा कल असतो.
वृक्ष लागवड, रक्तदान शिबीर व इतर ही आरोग्याची शिबीरे ते वर्षभर राबवित असतात. त्यामुळेच खासदार आढळराव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. (Shirur News ) यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, वात्सल्यसिंधू फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनंधा लंघे श्यामराव राऊत आदी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्याला मुख्य संयोजिका व नगरसोविका अंजली थोरात यांनी स्वागत केले. शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर थोरात यांनी प्रास्तावीक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले.
आदिवासी व ठाकर समाजातील महिलांना आरोग्य व मजूरीचा समस्या अधिक आहे. (Shirur News ) त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. महिलांनीच महिलांसाठी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला पाहिजे. पुरस्कार हा या कामाची पावती असली तरीही पुन्हा उत्तम कार्य करण्याचे प्रोत्साहन निर्माण करून देत असते.
वैशाली चव्हाण, तेजस्विनी फाऊंडेशन, शिरूर,
यावेळी माजी नगराध्यक्ष उज्वला बरमेचा, माजी नगरसेवीका संगीता मल्लाव, मनिषा कालेवार, तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण, वास्तल्यसिंधू फाऊंडेशनच्या सचिव उषा वाखारे, नागर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुख राजश्री मोरे, मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष डॅा. वैशाली वाखारे, पत्रकार दिपाली काळे, चित्रपट निर्मात्या डॅा. सुनीता पोटे, पार्श्वगायिका मीनल सोनवणे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशीकला काळे, अॅक्टिव्ह सोशल ग्रुप च्या अध्यक्षा कामिनी बाफना, शिरूर बार असोशियशनच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॅा. अमृता खेडकर, वैभवी पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा पाचंगे, सामाजीक कार्यकर्त्या पूनम गांधी, बचत गटाच्या महिला संघटक व महिला सक्षमीकरणासाठी काम करणार्या शकिला शेख यांना या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Shirur News )
महिलांसाठी हुशारी व कला कौशल्यांचे खेळ
शिरूचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथे वेगवेगळे खेळ व कलाकौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण मांढरे यांनी सुत्रसंचालन केले. (Shirur News ) प्रमिला गाडेकर या पैठणिच्या मानकरी ठरल्या. शिवकन्या झरेकर, सुनिल वाघमारे, हौसाबाई शिर्के यांना ही या खेळात नैपुण्य मिळवता आले. यावेळी नथ, पाटल्या, गृहउपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.