युनूस तांबोळी शिरूर Shirur News : ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती व्यवसाय असला तरी शेतीला पूरक व्यवसाय देखील सुरू झाले आहेत. (Shirur News) त्यामुळे शेत जमीनीवर शेतकरी, मेंढपाळ व्यवसायीक कार्यरत असतात. (Shirur News) या ठिकाणी काम करत असताना विज, पाणि तसेच अवकाळी पावसाचे संकटातून शेतकरी मार्ग काढताना दिसतो. (Shirur News) या संकटापेक्षाही बिबट हल्ले ही समस्या शेतकऱ्यांसाठी जीवघेणी आहे. (Shirur News)
बिबट हल्ले पाठोपाठ आता वन्य प्राण्यांचे मानवावर हल्ले हे नवीन संकट उभे राहिले आहे. अखेर जीव तर शेतकरी, कामगार, मेंढपाळ यांचाच जाणार आहे. या समस्यांवर वनविभाग कोणते धोरण राबविणार ? राजकीय पदाधिकारी लक्ष देणार का ? यातून शेती व्यवसाय संकटात येणार काय ? अखेर कष्टकरांचा जीव जाणार काय ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी विचारू लागले आहेत.
बागायती क्षेत्रात वाढ…
पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणि व्यवस्थापनातून ८० टक्के पेक्षाही अधिक क्षेत्र बागायती क्षेत्र झाले आहे. बारमाही शेतीला पाणि मिळण्यासाठी याचा उपयोग झाला आहे. त्यातून शेतीची वेगवेगळी उत्पादने घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. बाजारभाव नसला तरी देखील काबाडकष्ट करणारा शेतकरी पहावयास मिळतो. ऊस, कांदा, पालेभाज्या या पाठोपाठ वेगवेगळ्या फळबागांमधून उत्पादन घेतले जाते. त्यासाठी मजूरांची कमतरता भासत असली तरी देखील घाट माथ्याकडून येणारे मजूर यासाठी शेतात राबताना दिसतात.
शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या परिसरात शेती उत्पादने व शेती पूरक व्यवसायांना यामुळे चालना मिळाली आहे. कालव्यांच्या माध्यमातून आठमाही पाणि मिळत आहे. पाणि वापर संस्थेच्या माध्यमातून शेतीला पाण्याचे व्यवस्थापन झाले आहे. या परिसरात पाणि व्यवस्थापनाचे धोरण आखल्यामुळे जिरायत असणारे क्षेत्र देखील दिवसेंदिवस बागायती क्षेत्र तयार झाले आहे. या भागातील जमीनीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. एकंदर काय तर शेती व्यवसायासाठी या परिसरात सधनता आली असल्याचे दिसून येत आहे.
वन्य प्राण्यांची संख्या वाढली…
बागायती क्षेत्र त्यामुळे निर्माण झालेला अडोसा प्रामुख्याने निसर्गाची साखळी तयार करण्याचे काम करतो. अडोसा मिळाल्याने वन्य प्राण्यांना वास्तव करण्यासाठी सहज उपलब्धता झाली आहे. ऊसा सारखे क्षेत्रात १३ महिण्यांपर्यंत ऊस तोड होत नसल्याने अडोसा निर्माण होतो. त्यातून वन्य प्राण्यांना प्रजननासाठी लागणारा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळेच शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या परिसरात वन्य प्राण्यांची पैदास अधिक झाली आहे.
मेंढपाळ व्यवसायीक हिरव्या चाऱ्याच्या शोधात रानोमाळ भटकत असतात. त्यामुळे बिबट्या सारख्या प्राण्यांना त्यांची शिकार शोधणे व पकडणे सहज सोपे झाले आहे. शेती पूरक व्यवसायात कुकूटपालन करत असल्याने या ठिकाणी देखील वन्य प्राणी आपले भक्ष सहजतेने मारू लागला आहे. अन्न आणि पाण्याची सहज उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यातून वनविभाग वन्य प्राण्यांसाठी व पक्षांसाठी पाणि साठे तयार करून त्यांना संरक्षण देखील देताना दिसतात. त्यातून उन्हाळ्यात त्यांना चांगलेच संरक्षण मिळते.
प्राण्यांचे प्राण्यांवर हल्ले…
बागायती क्षेत्र व वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे वन्य प्राण्यांचेच प्राण्यांवर होणारे हल्ले हा भयावह विषय आहे. यातून वन्य प्राणी पिसाळला गेला तर तो कोणावरही हल्ला करू शकतो. दोन बिबट्यामध्ये झालेल्या मारामारीत बिबट्याचा मृत्यू मागिल काही काळात झालेली घटना आहे. मागील काळात जांबूत ( ता. शिरूर ) या परिसरात चिमुकले बालक, तरूण,तरूणी, जेष्ठ यांच्यावर बिबट्याचे हल्ले झाले. नागरिक, शेतकरी, मजूर यांच्यामध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर या परिसरात वनविभागाने प्रबोधन करून बिबट्यापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले. पण आजही या परिसरात बिबट्यांचा कळपाने दिसणारा वावर भयावह आहे. पशुधनावर होणारा हल्ला या घटना आजतागायत थांबल्या नाहित. एखादे पशुधन पिसाळलेले असेन त्याचे भक्ष वन्य प्राण्याने केल्यावर त्याचा परिणाम विचित्र होऊ शकतो. त्यामुळे वन्य प्राणी नरभक्षक होण्याची शक्यता आहे. त्याची काळजी वनविभाग कसे घेणार हा देखील अभ्यास करणारा विषय ठरू शकतो.
बिबट्या पाठोपाठ मानवावर वन्य प्राण्याचे हल्ले…
पाळीव प्राणी तसेच मानवावर होणारे बिबट हल्ले हा विषय या परिसराला नवीन राहिला नाही. बिबट पाठोपाठ कोल्हे देखील मानवावर हल्ला करू लागल्याने या घटना गांभींर्याच्या आहेत. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तामखरवाडी चे शेतकरी दशरथ मारुती मुंजाळ (वय ७०), पूजा विनोद कळकुंबे ( वय २५), सुरेश मारुती चोरे ( वय ४०) या तीन व्यक्तींवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी सोमवार ( ता. ५ ) चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला आहे.
हा कोल्हा पिसाळलेला असावा असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वन विभागाला येथे कोल्ह्याचे ठसे मिळाले नाही अथवा पुरावा नसल्याने तेथे कोल्हा नाही असे मत व्यक्त केले. पण तरीही वन्य प्राण्याने हल्ला केल्याने तेथील शेतकरी जख्मी झाले आहेत. तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथे सहा महिण्यापासून गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या वानराला वनविभागाने जेरबंद केले. नासधुस करणे तसेच मानवावर हल्ले यामुळे या वानराला सगळेच कंटाळले होते.
वनविभागा समोर नवीन प्रश्न…
बिबट्या पाठोपाठ अन्य वन्य प्राण्यांचे मानवावर होणारे हल्ले हा वनविभागासमोर नवीन प्रश्न आहे. या बाबत वनविभाग कोणते धोरण राबविणार याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहे. शेतीसाठी दिवसा वीज पुरवा अशी मागणी शेतकरी करतात. त्यातून वन्य प्राण्यांचे रात्री हल्ले कमी होतील. असा आग्रह राजकीय नेत्यांपुढे करणारे शेतकरी आता दिवसा होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले कसे रोखणार हा एक सवाल आहे. बिबट्याचा वावर आणि त्यावर प्रबोधन करून वनविभागाने आत्तापर्यंत शेतकऱ्यांची समजूत घातली. आता बिबट्या पाठोपाठ अन्य वन्य प्राणी हल्ला करू लागल्याने वनविभाग ही समस्या कशी हताळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन्य प्राण्यांचे ठसे अथवा तेथील सहवास आढळून आल्यास त्याला रोखता येईल. वन्य़ प्राणी असेल त्याला जोरबंद करून नैसर्गीक अधिवासात सोडता येईल. पण या ठिकाणी कोल्हा अथवा कोणत्याही वन्य प्राण्यांचे ठसे आढळून आले नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे जख्मींना २० हजार रूपयांपर्यंत वैद्यकिय सेवा पुरवली जाते. त्या पद्धतीने या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परीसरात कोणालाही पिसाळलेला वन्य प्राणी किंवा विचीत्र हालचाली करणारा प्राणी आढळल्यास त्यांनी वनविभागाला खबर द्यावी. त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई केली जाईल.
मनोहर म्हसेकर
शिरूर वन परिक्षेत्र अधिकारी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News | लोकसहभाग आणि नाम फाऊंडेशन करणार पाणीदार गाव ; ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती