युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : जांबूत ( ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल दहावी तील फेब्रुवारी, मार्च २०२३ परिक्षीचा शेकडा निकाल ९९.२२ टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सतिष फिरोदिया यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. (128 students of Jai Malhar High School in Jambut passed class 10; 99.22 percent result)
यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी केले अभिनंदन
या विद्यालयात एकून १२९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये प्रथमात प्रथम श्रेणीत 38 विद्यार्थी, प्रथम श्रेणीच ५९, व्दितीय श्रेणीत २६, पास श्रेणीत ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रेड 1 -59
ग्रेड 2- 26
पास ग्रेड – 05
एकूण पास-128
या विद्यालयातून प्रथम क्रमांक श्रेया राम देशमुख- 94.80 टक्के, द्वितीय क्रमांक त्रिशला प्रमोद जगताप 93.20 टक्के, तृतीय क्रमांक सानिका भाऊसाहेब जोरी 93.00 टक्के, चतुर्थ क्रमांक मयुरी उद्देश सोनवणे – 91.20टक्के, पाचवा क्रमांक तृप्ती धनंजय थोरात 88.00टक्के गुण मिळवले आहे. (Shirur News)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच दत्तात्रेय जोरी, नाथा जोरी, डॅा. खंडू फलके, यांनी अभिनंदन केले आहे.
परीक्षा ही विद्यार्जनाचे एक साधन आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम केले पाहिजे. एखाद्या परिक्षेत अपयश आले तर खचून न जाता पुढिल काळात जोमाने पुन्हा परिक्षेला सामोरे जावे. यशस्वी विद्यार्थ्यांनी योग्य स्पर्धात्मक युगात शिक्षणाची पायरी आत्मसात करावी.
सतीष फिरोदिया, मुख्याध्यापक जय मल्हार हायस्कुल,जांबुत