Shirur News : पुणे : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने दहावीची परीक्षा दिलेली होती. फक्त शेवटचा भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र त्या आधी तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण काल दहावीचा निकाल लागला आणि शिक्षकांनी ‘ती’ पास झाल्याची माहिती देताच तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला. (Heartbreaking! Even before the results of class 10, the student was overtaken by time; Seeing the result, everyone including the family was shocked)
कान्हूर मेसाई येथील घटना
शिरूर तालुक्यातील कान्हूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वीच्या वर्गात प्रगती किसन गोरडे (रा. फलकेवाडी) असे तिचे नाव. प्रगती एक गुणी विद्यार्थिनी होती. तिचे आई-वडील शेतमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. साधे सरळ जीवन जगणारे गोरडे कुंटुंबीय. गोरडे दाम्पत्याला तीनही मुली, मुलगा नाही. (Shirur News) गरिबी असूनही हसतखेळत प्रपंचाचा गाडा ओढणारे हे कुटुंब. मुलींमध्ये प्रगती सर्वात थोरली असल्याने तिच्यावर सारी भिस्त होती. प्रगतीला खूप शिकवायचं आणि तिला नर्स करायचं आहे, असं तिचे वडील पालकसभेला आले की शिक्षकांना सांगायचे. सर्व शिक्षकांनाही गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने तिला मदतीचा हात पुढे केला. प्रगतीला दहावीच्या परीक्षेत ७४.४० टक्के गुण मिळाले.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं. अभ्यास करून पास व्हायचे ह्या निर्धाराने व आपल्या गरीब आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीने अभ्यास केला आणि परीक्षा दिली. भूगोल विषयाचा पेपर बाकी होता.(Shirur News) घरात खेळताना अपघात झाला आणि प्रगतीचा त्यात मृत्यू झाला. तिच्या मृत्यने आई वडील हबकून गेले आहेत.
मात्र, परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला. जिच्याबद्दल काही स्वप्न पाहिली होती,ती सारी धुळीला मिळाली होती. कारण प्रगती चांगल्या मार्क्सने पास होऊनही त्याचा आता काही उपयोग नाही.(Shirur News) शिक्षकांनी प्रगतीचा निकाल पालकांना सांगताच “पण तो निकाल बघायला आमची प्रगती कुठे आहे सर, ती तर कधीच देवा घरी गेली” असे म्हणत तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती ग्लोबल स्कूलचा दहावीचा निकाल जाहिर
Shirur News : टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.८५ टक्के
Shirur News : जांबूतच्या आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला