Shirur | शिरूर : चांहोड (ता. शिरूर) येथील तुषार व भाग्यश्री शेलार हे दाम्पत्य पोलीस भरती झाल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बहिण भाऊ पोलीस भरती झाल्याची माहिती समोर आली आहे.
लक्ष्मण नारायण सोळंके व राधा नारायण सोळंके अशी पोलीस दलात भारती झालेल्या बहिण भावांची नावे आहेत.
नारायण सोळंके व गंगा सोळंके हे मुळचे सावरगाव बुद्रुक ( जि. जालना) गावचे आहेत. त्यांची परिस्थिती हलाकीची असल्याने ते शिक्रापूर येथे व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आले. त्यांना लक्ष्मण, विजय व राधा ही तीन मुले आहेत. त्यांनी सुरुवातीपासून मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट केले. वडील नारायण हे चहाचा गाडा चालवून तर आई गंगा ही शेतात काम करुन कुटुंब चालवू लागले.
दरम्यान, मुले मोठी झाल्यावर शिक्षणासह काही काम धंदा करु लागली. मोठा मुलगा लक्ष्मण दुचाकी दुरुस्तीचे तर विजय कंपनीत काम करु लागला. मात्र दुचाकी दुरुस्तीचे काम करत असताना लक्ष्मणने मन लावून अभ्यास करीत होता. लक्ष्मण अभ्यास करीत असल्याचे पाहून अनेकांनी त्याची थट्टा केली. परंतु काहीही झाले तर आपण पोलीस दलात जायचेच हे लक्ष्मणने ठरवले होते.
सोळंके यांची लहान मुलगी राधा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या भावाचेच पुस्तके वापरुन आपण देखील पोलीस व्हावे. असे तिला वाटू लागले. त्यानंतर तिनेही अभ्यास सुरु केला. तत्पूर्वी लक्ष्मणने २०२१ पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र त्यात त्याला अपयश आले. परंतु, त्यांची जिद्द हरली नव्हती.
लोणीकंद येथील डिफेन्स करिअर अकादमीमध्ये पोलीस भरतीचा सराव…
त्यानंतर लक्ष्मण व त्याची लहान बहिण राधा या दोघांनी लोणीकंद येथील डिफेन्स करिअर अकादमीमध्ये पोलीस भरतीचा सराव केला. दोघांनीही मन लावून अभ्यास केला. दोघांनीही पोलीस भरतीची परीक्षा दिली. सध्या जाहीर झालेल्या पोलीस भरती मध्ये लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके या दोघा बहिण भावांनी यश संपादित करुन आपल्या सह आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. तर आपली दोन्ही मुले पोलीस भरती झाल्याचे ऐकून आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
आम्ही केलेल्या कष्टाचे मुलांनी चीज केले आहे. मुलांचे यश पाहून आम्ही आमचे कष्ट सुद्धा विसरुन गेलो आहे. असे लक्ष्मण व राधा यांचे वडील नारायण व आई गंगा यांनी सांगितले आहे. तसेच मुलांच्या यशाबद्दल त्यांनी मुलांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
आमच्या आई वडिलांच्या कष्टाची आम्हाला जाणीव आहे. तसेच काहींनी केलेल्या चेष्टेमुळे आम्हाला तोटा नाही तर फायदाच झाला आहे. यामुळे आम्ही शालेय शिक्षणाबरोबर पोलीस भरतीमध्ये जिद्दीने यश संपादित केले आहे. आणि यापुढील काळात देखील आम्ही पुढील परीक्षांना सामोरे जाणार आहे. असे लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | वडूज नगरीमध्ये बेरोजगारांच्या मूलभूत गरजासाठी महा रोजगार मेळावा संपन्न
Shirur News : कवठे येमाई येथील बाजीराव उघडे ;समाज रत्न; पुरस्काराने सन्मानित..!