पुणे : पुण्यात एका महिलेला वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून स्वतः कपिल शर्मा बोलत असल्याचे सांगून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी पावणे बारा ते दुपारी एक च्या सुमारास कल्याणी नगर येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
अधिक माहिती अशी की, ही महिला कल्याणी नगर येथील एका आलिशान सोसायटीमध्ये राहण्यास आहे. तिच्या कार्यालयामध्ये असताना आरोपीने तिला मोबाईलवर दहा वेळा फोन केला. ‘मै कपिल शर्मा बात कर रहा हू। पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ऑयो हॉटेल मे मिले थे। दीपक है क्या?’ असे बोलून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिने पतीला फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.(Fake Kapil Sharma)
तिच्या पतीने आरोपीला याबाबत फोन करून जाब विचारला. त्यावेळी त्याने ‘तेरी वाइफ ओयो मे जाती है। गलत काम करती है। उसको देखो।’ असे बोलून त्यांना देखील आई बहिणी वरून घाणेरड्या शिव्या दिल्या. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत. (Yerwada Police)