Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : ‘गुरुकुलम’मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ अन् साहित्य फराळाची आगळी मेजवानी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 12:55

पिंपरी : दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सअॅप समूहावरील साहित्यिकांनी चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळ वितरण तसेच गुरुकुलमसाठी ५६ खुर्च्या भेट दिल्या.

या वेळी कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, डॉ. पी. एस. आगरवाल, शोभा जोशी, कैलास भैरट, सुभाष चव्हाण, ‘दिलासा’चे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सर्व समूहाच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली.

या वेळी उपक्रमात सहभागी असलेल्या नंदकुमार मुरडे, राधाबाई वाघमारे, अशोक महाराज गोरे, नीलेश शेंबेकर, मुरलीधर दळवी, योगिता कोठेकर, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, मानसी चिटणीस, बाजीराव सातपुते, बाळकृष्ण अमृतकर या साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.

 

याप्रसंगी श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेल्या भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत देताना समाज ऋणातून अंशतः उतराई होण्याचे समाधान साहित्यिकांना लाभले आहे,” अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “साहित्यिकांनी नुसते लिहून न थांबता व्यक्त व्हायला अन् कृती करायला शिकले पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. पी. एस. आगरवाल यांनी, “दिवाळीत फराळाइतकेच दिवाळी अंकांचे महत्त्व आहे म्हणून विद्यार्थ्यांना फराळासोबत दिवाळी अंक आणि पुस्तकांचा साहित्य फराळ दिला आहे,” असे सांगितले.

गिरीश प्रभुणे यांनी, “साहित्यिक हे शब्दरूपाने सतत समाजाला वैचारिक धन देत असतात; परंतु आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. डोक्यावरील आभाळ सोडून दुसरे काहीही ज्यांच्या स्वतःच्या मालकीचे नाही अशी मुलं आपण दिलेल्या खुर्च्यांवर बसून स्वप्नपूर्तीसाठी झटतील,” असा आशावाद व्यक्त केला.

मान्यवर आणि पाच प्रातिनिधिक विद्यार्थी यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कैलास भैरट यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, मोबाइलवर असंख्य व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत; पण असा विधायक उपक्रम राबविणारा दिलासा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे याचा आनंद वाटतो. त्यांनी उपक्रमात सहभागी साहित्यिकांच्या यादीचे वाचन केले.

या वेळी गुरुकुलममधील विद्यार्थ्यांसोबत साहित्यिकांनी फराळाचा आस्वाद घेतला; तसेच शंकर पवार, शामराव सरकाळे, शोभा जोशी, शाहीर आसराम कसबे यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी बालगीते, कविता आणि शाहिरी कवनांचे सादरीकरण केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post
Man falls from local train in between diva and kopar station

दौंडला उपनगर दर्जा देऊन ईएमयु लोकल सुरु करा, अन् मगच मत मागायला या: पुणे - दौंड रेल्वे प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.