लोणी काळभोर, ता. 21 : जन्मदात्या आईनेच पोटच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका 35 वर्षीय चालकाला अत्याचार करायला लावून त्याच्यासोबत बालविवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कुंजीरवाडी परिसरात डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात निर्भयाच्या आईसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेची आई राणी (वय 35, बदललेले नाव) व मधुकर यशवंत गायकवाड (वय 35 , रा. सुगाव, ता. देगलूर, जिल्हा नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही 14 वर्षाची असून ती आईसोबत कुंजीरवाडी परिसरात राहत होती. फिर्यादी, फिर्यादी यांची आई व आरोपी मधुकर गायकवाड हे एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपी हा वाहनचालक असून फिर्यादी यांच्या घरातच राहत होता.
दरम्यान, डिसेंबर 2024 मध्ये एके दिवशी (तारीख व वार माहिती नाही) रात्री आरोपी मधुकर गायकवाड याने लहान बहीण व भावाला सिंधी पाजली. त्यावेळी पीडितेने आईला याबाबत सांगीतले होते. परंतु आई काहीच बोलली नाही. त्यानंतर पीडिता झोपल्यानंतर आरोपी मधुकर हा जवळ आला. त्याने पीडितेला किचन मध्ये नेवुन सर्व कपडे काढुन बलात्कार केला. याबाबत पीडितेने आईला सांगितले असता, आईने म्हणाली, त्याला काय करायच ते करू दे असे म्हणुन झोपी गेली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडितेच्या आईने आरोपी सोबत बळजबरीने विवाह करून दिला. विवाहाच्या काही दिवसानंतर पीडिता यांना उलट्या सुरू झाल्याने त्या गर्भवती असल्याचे समोर आले. आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मधुकर गायकवाड याने फिर्यादी यांची आई राणी यांच्या संमतीने पीडितेवर अत्याचार केला आहे. तसेच पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्यांचा बालविवाह करून दिला आहे.
याप्रकरणी पीडितेने आई व मधुकर याच्या विरोधात नांदेड येथील मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधि, 2006 चे कलम 10, 11, 09, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधि. 4,6,8, सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5), 64(2), 65 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार करत आहेत.