पुणे : एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायानेचे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी देखील आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वाघोली परिसरात राहण्यास आहे. फिर्यादी यांचा दहा वर्षीय मुलगा हा वाघोलीत असलेल्या एका नामांकित शाळेत आहे. 19 एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला शाळेमध्ये सोडले. त्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला त्याचे नाव विचारले.
त्याच्याशी गोड बोलून त्याला ‘तूला चित्रपट आवडतात का? अशी विचारणा केली असता, पीडित मुलाने हो उत्तर दिल्यानंतर आरोपीने टॉयलेटमध्ये चल मी तुला एक फिल्म दाखवतो असं म्हणाला. पिडीत मुलाने त्यांना नकार दिला. मात्र, आरोपी शिपायाने इथले सगळे कॅमेरे बंद आहेत, तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही असं सांगून त्याच्यावर जबरदस्ती करू लागला.
आरोपीच्या या कृत्याला घाबरून पिडीत मुलगा पळून गेला. त्यानंतर आरोपी पुन्हा वर्गात येऊन तुला इथेच फिल्म दाखवतो असे बोलून त्यांनी मोबाईलमध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी देखील दिली. याबाबत पिडीत मुलाच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.