लोणी काळभोर, (पुणे) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता गीताराम लांडगे यांची शुक्रवारी (ता. १७) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सविता लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने अशोक शिंदे यांनी लांडगे यांची सरपंचपदी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
सविता लांडगे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी व तळाती पद्मिनी मोरे यांनी निवडणुकीचे कामकाज पहिले.
यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास आण्णा काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ललिता काळभोर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे, शिवदास काळभोर, सामाजिक कार्यकर्ते गीताराम लांडगे, सचिन काळभोर, अमित काळभोर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच सविता लांडगे म्हणाल्या, “लोणी काळभोर गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. लोणी काळभोर गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”