Saswad News : सासवड : पुणे पंढरपूर महामार्गावरून एसटी बसमधून आळंदीला चाललेल्या वारकऱ्यांच्या बसची आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना भोरवाडीफाटा (ता. पुरंदर) येथे शनिवारी (ता.) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वारकऱ्यांसह ६ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.(Terrible accident of STbus and pick-up carrying passengers on Pune-Pandharpur highway)
पुरंदर तालुक्यातील भोरवाडीफाटा येथे घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पालखी महामार्गावर जेजुरी जवळील भोर वाडी फाटा येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारी एस.टी बस आणि कोंबड्यांची वाहतूक करणारा पीक अप यांची सामोरा समोर धडक झाली. (Saswad News ) एसटीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेजुरी देव संस्थान आणि खासगी रुग्णालयातील दोन अशा तीन रुग्णवाहिकांसह अपघातस्थळी धाव घेतली. (Saswad News ) जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. (Saswad News ) सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Saswad News : काळेवाडी येथील पंपावर पार्क केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी डिझेल चोरले