Sassoon Hospital | पुणे : ससून रूग्णालयात येणा-या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयामधील मेडिकल स्टोअरमधूनच मोफत औषधे द्याव्यीत. औषधे बाहेरुन आणण्यासाठी चिठ्ठी दिल्यास, कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी डाॅक्टरांना तंबी दिल्यानंतर अखेर मोफत औषधे मिळण्यास सुरुवात झाली आहे.
“झिरो प्रिस्क्रिप्शन’च्या अंमलबजावणीला सुरूवात…
सोमवारपासून “झिरो प्रिस्क्रिप्शन’च्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून रुग्णालायाच्या मेडिकल गर्दी दिसू लागली आहे. रुग्णालयाच्या आवारात मेडिकल स्टोअर आहे. त्यामुळे औषधे घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे.बाहेर औषधे आणण्यासाठी चिठ्ठी देऊ नये असे आदेश असताना देखील एका एक-दोन डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून देण्याचा प्रताप केला. मात्र त्यांना तोंडी समज देण्यात आली.
दरम्यान, बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी डॉक्टरांनी लिहून दिल्यास, संबंधित डॉक्टरांवर कारवाई होणार आहे. एवढेच नव्हे तर आवारात असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये ससूनची चिठ्ठी घेऊन आलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी सोमवारी औषध दुकानांच्या बाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आले. याबाबत विक्रेत्यांनी अधिष्ठाता कार्यालयात तक्रार केल्याचे समजते.
रुग्णांना मोफत औषधांचे धोरण कळावे, यासाठी ससूनमधील 18 एलईडी स्क्रीनवर माहिती दिसेल अशा स्वरूपात जाणार आहे. औषध दुकानांच्या बाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. औषधांची चिठ्ठी देऊ नये, यासाठी “मार्ड’च्या डॉक्टरांची सोमवारी बैठक घेण्यात आली. त्यात त्यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. असे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतून भाजपचा ;यु टर्न
Pune News | वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले
Shirur Crime News : निमोणे येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, परिसरात खळबळ..!