-बापू मुळीक
सासवड : HSBC अर्थसहाय्यीत अफार्म संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “हवामानाधारित उपजिविका सक्षमीकरण प्रकल्प” च्या माध्यमातून गुरोळी या गावात फळबाग रोप व गांडुळ खत संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.
गुरोळी, उदाचीवाडी, वनपुरी सिंगापूर व सोनोरी या पाच गावातील शेतकऱ्यांना आंबा, अंजीर, जांभूळ, पेरू अशा प्रकारची रोपे वाटण्यात आली. शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना संस्थेकडून सेंद्रिय खतांचे वाटप केले जाणार आहे, असे संस्थेचे सहकारी महेश सदातपुरे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या वतीने अफार्म संस्थेचे महेश सदातपुरे,श्री.अमितकुमार मेहञे, बाजीराव मंडलिक, माजी सरपंच मोहिनी खेडेकर, राष्ट्रवादी गटाचे सोशल मीडिया पुरंदर तालुका अध्यक्ष मनोहर खेडेकर, वर्षा खेडेकर, सारिका खेडेकर, सुवर्णा खेडेकर, गणेश खेडेकर, दिलीप खेडेकर, गणपत खेडेकर, दत्तात्रय लोणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.