हनुमंत चिकणे
Sant Tukaram Maharaj Palkhi | उरुळी कांचन (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात नेण्यास पालखी सोहळा प्रमुखांनी नकार दिला आहे. यामुळे उरुळी कांचन ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी 10 जून ते 28 जून यादरम्यान चा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये उरुळी कांचन चा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठल प्रेमी वैष्णवांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पालखी प्रमुखांच्या आडमुठेपणाबद्दल उरुळी कांचन ग्रामस्थांच्यात नाराजी
याबाबत बोलताना माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी सांगितले की , वारकरी सांप्रदायाच्या वैष्णवांचा मेळा हा गेल्या 338 वर्षांपासून देहू ते पंढरपूर असा चालवला जातो, तो मार्गस्थ होत असताना वेगवेगळ्या गावातून, वाड्या वस्त्यांतून रस्त्याने जात असतो, या मार्गातील वैष्णवाला तुकाराम महाराजांबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो, उरुळी कांचन गावातील काळभैरवनाथ मंदीरात दुपाऱच्या विसाव्यासाठी हा सोहळा मागिल कित्येक वर्षापासुन येत आहे. मात्र यावर्षी सोळळा प्रमुखांनी पालखी गावात नेण्यास नकार दर्शवला आहे. ही बाब अतीशय चुकीचे व उरुळी कांचन ग्रामस्थांच्या अस्मितेला दुखावणारी आहे. अशा या पारंपारिक धार्मिक सोहळ्याला अशा पदाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे चुकीच्या पायंड्यांना सामोरे जावे लागते आहे हे अतिशय वाईट आहे.
दरम्यान उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरातच घ्यावा अशी मागणी केलेली आहे, तसेच श्री काळभैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक राजाराम कांचन यांनी हवेलीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) संजय आसवले यांना फोनवरून याबाबतची कल्पना दिली व परंपरेप्रमाणे पालखी सोहळा उरुळी कांचन गावामध्ये काळभैरवनाथ मंदिरामध्ये विसाव्यासाठी थांबवण्याची मागणी केली आहे, याला अनुसरून प्रांत अधिकारी संजय आसवले यांनी शुक्रवारी उरुळी कांचन ग्रामस्थ, काळभैरवनाथ सेवा समितीचे पदाधिकारी, उरुळी कांचन देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी यांची एक बैठक पुण्यामध्ये बोलावली आहे, या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन संजय आसवले यांनी दिले आहे
संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार असून हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी असेल मात्र पारंपारिक पद्धतीने हा सोहळा लोणी काळभोर चा मुक्काम आटवून उरुळी कांचनच्या ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी थांबत असतो .
ही परंपरा पालखी सोहळा जसा हडपसर वरून एक पालखी सासवड मार्गे आणि एक पालखी लोणी काळभोर मार्गे मार्गस्थ होऊ लागल्या त्यावेळी पासून हा प्रघात… पायंडा… रुढी आहे परंतु गेल्या काही वर्षापासून देहू संस्थांनचे पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी कारण नसताना उरुळी कांचन वाशीयांना वेठीस धरून प्रत्येक वेळी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला की उरुळी कांचनला विसाव्याला मंदिरात न जाता सोलापूर रोडवरच थांबणार, उरुळी कांचन ग्रामस्थांनी तेथेच आमची सोय करावी अशा पद्धतीची भाषा वापरून उरुळी कांचन व पंचक्रोशीतील जनतेला त्रास देण्याचे काम करीत आहेत.
ग्रामस्थांनी वारंवार विनंती करून देखील त्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेत बदल होत नाही, म्हणजेच नेमका हा पालखी सोहळा वैष्णवांचा आहे… संत तुकाराम महाराजांचा आहे का? या पाच दहा मंडळींचा आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!