Sambhaji Maharaj Jayanti 2023 | पुरंदर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’अशा गगनभेदी घोषणांनी पुरंदर किल्ला आणि परिसर दुमदुमला. सासवड चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तब्बल ५१ बैल गाड्यांना भगवे झेंडे…
उद्योजक नवनाथ भिसे आणि शिवराजे प्रतिष्ठान पानवडी यांच्यावतीने जयंतीच्या कार्य़क्रमाचे आयोजन करण्यात आले. पानवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. तब्बल ५१ बैल गाड्यांनी भगवे झेंडे लावून पंचक्रोशीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच आबासाहेब लोळे , माजी सरपंच हरिभाऊ लोळे, माऊली भिसे, संदीप भिसे, अंकुश भिसे, युवराज भिसे, लक्ष्मण भिसे, दादासाहेब भिसे, बाळासाहेब भिसे, रवी झेंडे, बाळासाहेब लोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संभाजी महाराज यांचे जन्म ठिकाण किल्ले पुरंदरवरुन ज्योत आणली. ग्रामस्थांनी बैल गाड्यांना फगवे झेंडे लावले होते. तसेच डोक्यात भगवी टोपी परिधान केली होती. जयंतीनिमित्ताने पंचक्रोशीत उत्साहाचे वातावारण होते.
सायंकाळी डीजेच्या तालावर पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.