Sad News | उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) येथील गोरखनाथ उर्फ आण्णा रामचंद्र खेडेकर (वय-४०) यांचे सोमवारी (ता. २९) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.
दरम्यान, गोरखनाथ खेडेकर हे शेतकरी कुंटुंबातील होते. तसेच ते हडपसर येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. गोरखनाथ खेडेकर यांच्यावर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिंदवणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते मोहन खेडेकर यांचे ते बंधू होत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sad News | दुर्दैवी! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना…