लोणी काळभोर, (पुणे) : झी मराठी या टीव्ही चॅनेलवर ‘सारेगमपा लिटिल चॅम्प २०२३’ ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथील आदित्य फडतरे हा देखील अंतिम फेरीत पोहचला होता. यावेळी कार्यक्रमावेळी आदित्यला आवडी-निवडीबाबत विचारले असता त्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात प्रसिद्ध असलेले हॉटेल एस4जी या ठिकाणी जेवण करायला, गाणे गायला आवडते, असे भर कार्यक्रमात सांगितले होते.
त्यानुसार, या आवडी निवडीची गोष्ट लक्षात घेता झी मराठीने हॉटेल एस4जीच्या टीमला या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह परिसरात एक वेगळेच कुतूहल निर्माण झाले होते. तसेच पहिल्यांदाच एखाद्या हॉटेल व्यवसायिकांना या मंचावर निमंत्रित करण्यात आले होते.
पूर्व हवेलीसह पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणारे आणि प्रत्येकाला हवेहवेसे वाटणाऱ्या या हॉटेलला परिसरातील सर्व आपल्या पाहुण्यासह एकदा भेट देऊन जेवणाचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन हॉटेल एस4जीच्या टीमने महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले आहे.
दरम्यान, हॉटेल एस4जी हे आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपर्यात पोहचले आहे. झी टिव्ही मंचावर हॉटेल एस4जी टीमने आदित्य फडतरेसाठी खास रॉकस्टार आदित्य व्हेज थाळी लाँच केली. आपल्या भागातील मराठी उद्योजक भरारी घेत आहेत, याचा सर्वांना अभिमान असल्याचे कौतुक यावेळी झी मराठीच्या वतीने करण्यात आले. यावेळी संग्राम जगताप व नितीन टोणपे उपस्थित होते.
हॉटेल एस4जीच्या दोन शाखा…
याबाबत हॉटेल एस4जीचे मालक शिवाजी जावळे, संदीप कुंजीर, संदेश भोंडवे व गजानन सानप म्हणाले, “आमच्या पूर्व हवेलीतील पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा व दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत हद्दीत दोन शाखा आहेत. लक्झरी हॉल, फॅमिली समारंभ, सेमिनार, पार्टी, वाढदिवस, मिटींग, विवाह सोहळा यासाठी वातानुकूलित सेवा सुविधा, खाद्यपदार्थाची विविधता, ग्राहकांच्या इच्छा, अपेक्षा व त्यांचे समाधान हेच उद्दिष्ट ठेवून हॉटेल एस4जी यशस्वी वाटचाल करत आहे”.