सासवड : वाळूज (ता.पुरंदर) ग्रामपंचायतच्या सरपंच पदी रेश्मा चौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कैलास म्हेत्रे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक निर्णय अधिकारी दुर्गादास शेळकंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी रेशमा चौरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे शेळकंदे यांनी जाहीर केले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे, ग्रामपंचायत उपसरपंच कैलास इंगळे, ग्रामपंचायत सदस्य योगिता इंगळे, सुप्रिया इंगळे, नीता खोमणे, अनिल इंगळे, तलाठी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विपुल पाटील, ग्रामसेविका सोनाली पवार, गोविंद इंगळे, अंकुश इंगळे, लक्ष्मण मेत्रे, प्रशांत मेत्रे, विकास मेत्रे, बापू चौरे, संजय चौरे, सदाशिव चौरे, परशुराम चौरे, अनिकेत नवले, योगेश जगताप, शुभम राऊत, दत्तात्रेय मेत्रे, प्रकाश इंगळे, चंद्रकांत इंगळे आदी उपस्थित होते.
गावातील प्रमुख प्रश्न सोडवून गावच्या विकासावर भर देणार आहे. महिलांसाठी शासकीय योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे, तसेच गावकरी यांच्यासाठी पाणी, आरोग्य, वीज, शेतकरी याकडे प्राधान्यांने काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रेशमा चौरे यांनी सांगितले. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच चौरे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .