Paris Olympics 2024 : पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं असून देशाचं नाव उंचावलं आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच हे पहिलं कांस्यपदक ठरलं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं. अशी प्रतिक्रिया पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने दिली.

मनू भाकरचा फायनलमध्ये स्कोर
- पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
- दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
- उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
???????????? ???????????????????????? ????????????????????????????????????????! Manu Bhaker wins India’s first medal at #Paris2024 and what a way to do so! From heartbreak at Tokyo to winning a Bronze at Paris, Manu Bhaker’s redemption story has been wonderful to witness.
???? A superb effort from her and here’s hoping… pic.twitter.com/O7tqOuGFTa
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024

मनू भाकर विषयी..
22 वर्षीय मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपली छाप पाडली आहे.

नेमबाजी विश्वचषकात नऊ सुवर्ण..
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.
सरबज्योत, अर्जुन यांची निराशजनक कामगिरी..
सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंह चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवू शकले नाहीत. सरबज्योत पात्रता फेरीत 577 गुणांसह नवव्या स्थानावर, तर अर्जुन 574 गुणांसह 18व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.







