Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वाभिमानी जनतेने दादांच्या पार्टीला टोपी घातली..: रोहित पवार यांची अजित पवारांवर खोचक टीका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 28 July 2024, 17:17

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचा भाग म्हणून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कशा बैठका केल्या, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. यावरून आता आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जात असे. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असे वक्तव्य केले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

दादांनी टोपी घातली असावी. पण,..

अजित पवारांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते. आत्ताचे भाजपसोबत गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे त्यांची फाईल जाते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते. दादांनी टोपी घातली असावी. पण, आपण लोकसभेमध्ये बघितलं तर स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली आहे, असा खोचक टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.

बारामतीत आमच्याकडून चांगली लढत होईल..

बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी कुठला उमेदवार देणार याबाबत विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, बारामतीत योग्य असा उमेदवार देऊ, राजनीतीचा तो भाग आहे. पुढील वीस दिवसात समजेल की तिथे उमेदवार कोण असेल, उमेदवार जो कोणी असेल, योग्य उमेदवार तिथे दिला जाईल. तिथे खूप चांगली लढत आमच्याकडून होईल, असेही ते म्हणाले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता बच्चन कुटुंब? अमिताभ, अभिषेक बच्चनला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

Monday, 16 November 2026, 20:11

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

Monday, 16 November 2026, 19:42

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26
Next Post

लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp