Ration Card Will Now Be Available Online : पुणे : रेशन कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन रेशन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Ration card will now be available online)
अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला निर्णय
राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने या संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या युक्तीचा सरकारी कार्यालयांमध्ये काम करताना सामान्यांना अनुभव येतो. (Ration Card Will Now Be Available Online) सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालये, परिमंडळ कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी पिळवणूक करण्यात येत होती. (Ration Card Will Now Be Available Online) अनेकांनी तर तहसील आणि परिमंडळ कार्यालयात रेशन कार्डसाठी दुकाने थाटली होती. रेशन कार्ड काढण्यासाठी एजंटांना पैसे दिल्याशिवाय कार्ड मिळत नव्हते. त्यामुळे रेशन कार्ड कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणात एजंटाचा सुळसुळाट झाला होता. वीस रुपयांमध्ये मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी नागरिकांना दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे सामान्यांची आर्थिक पिळवणूक होत होती.
रेशन कार्ड ऑनलाइन
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना; तसेच राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे. (Ration Card Will Now Be Available Online) अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून ही ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.
वीस दिवसांची मुदत
ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी संकलित करणार आहेत. त्यानंतर अर्जदार नेमका कोणत्या प्रकारातील आहे यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. (Ration Card Will Now Be Available Online) अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वीप्रमाणे सात दिवस लागणार आहे. रेशन कार्ड अंतिम झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे. त्यात रेशनसाठी त्याला कोणते दुकान मिळाले आहे, याचाही उल्लेख असणार आहे.
ऑनलाइन रेशनकार्ड मिळण्याच्या पद्धतीमुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. यासंदर्भातील माहिती ऑनलाइनच उपलब्ध झाल्याने पुढील सोपस्कार कमी होणार आहेत.- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी
रेशन कार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. ऑनलाइन सुविधामुळे या लॉबीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
– गणेश डांगी, अध्यक्ष रेशन कार्ड दुकानदार संघटना
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर ; जिल्ह्यात केवळ ३८ केंद्रे सुरू..