Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ration Card Will Now Be Available Online : रेशन कार्ड आता मिळणार ऑनलाईन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 13:48

 

 

Ration Card Will Now Be Available Online : पुणे : रेशन कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन रेशन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Ration card will now be available online)

अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला निर्णय

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने या संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या युक्तीचा सरकारी कार्यालयांमध्ये काम करताना सामान्यांना अनुभव येतो. (Ration Card Will Now Be Available Online) सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालये, परिमंडळ कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी पिळवणूक करण्यात येत होती. (Ration Card Will Now Be Available Online) अनेकांनी तर तहसील आणि परिमंडळ कार्यालयात रेशन कार्डसाठी दुकाने थाटली होती. रेशन कार्ड काढण्यासाठी एजंटांना पैसे दिल्याशिवाय कार्ड मिळत नव्हते. त्यामुळे रेशन कार्ड कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणात एजंटाचा सुळसुळाट झाला होता. वीस रुपयांमध्ये मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी नागरिकांना दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे सामान्यांची आर्थिक पिळवणूक होत होती.

रेशन कार्ड ऑनलाइन
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना; तसेच राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे. (Ration Card Will Now Be Available Online) अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून ही ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.

वीस दिवसांची मुदत
ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी संकलित करणार आहेत. त्यानंतर अर्जदार नेमका कोणत्या प्रकारातील आहे यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. (Ration Card Will Now Be Available Online) अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वीप्रमाणे सात दिवस लागणार आहे. रेशन कार्ड अंतिम झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे. त्यात रेशनसाठी त्याला कोणते दुकान मिळाले आहे, याचाही उल्लेख असणार आहे.

ऑनलाइन रेशनकार्ड मिळण्याच्या पद्धतीमुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. यासंदर्भातील माहिती ऑनलाइनच उपलब्ध झाल्याने पुढील सोपस्कार कमी होणार आहेत.- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

रेशन कार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. ऑनलाइन सुविधामुळे या लॉबीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
– गणेश डांगी, अध्यक्ष रेशन कार्ड दुकानदार संघटना

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड ; औंध परिसरातील सिंध सोसायटीसह तीन ठिकाणी छापेमारी, परिसरात खळबळ..!

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी.! ‘या’ दिवासापासून शहरात पाणी कपात ; आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती..!

Pune News : शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर ; जिल्ह्यात केवळ ३८ केंद्रे सुरू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34

पैसे तयार ठेवा, सोनं घेण्याची वेळ आली! इराण-इस्त्रायल युद्धामुळे दरात मोठी घसरण

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post

Uruli Kanchan News : कोरेगाव मुळच्या ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.