Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 1 October 2026, 9:24

पुणे: अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याकडे निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटात लुटल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास बोगद्याजवळ दुचाकी अडवून 3 जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. या दागिन्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या मदतीने काही तासांतच संशयित आरोपींपर्यंत पोहोचत तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिन्ही आरोपी पिंपरी परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर परिसरात राहणारे 46 वर्षीय नागरिक आणि त्यांची पत्नी मंगळवारी पहाटे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. अंगारकी चतुर्थी असल्याने गणपती दर्शनासाठी ते शहरात येत होते. प्रवासादरम्यान ते जुन्या कात्रज बोगद्याजवळ पोहोचले.

याच ठिकाणी अंधाराचा फायदा घेत काही जणांनी त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी दाम्पत्याला धमकावले आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दाम्पत्य घाबरले.

 

घटनेनंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाची दिशा निश्चित केली. तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत पोलिसांनी तौहिद असल शहा (वय 23), सुलेमान यासिन शेख (वय 21) आणि रोहित बबलू सिंग (वय 20), तिघेही रा. पिंपरी, यांना अटक केली. या आरोपींनी कात्रज घाट किंवा परिसरात यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40
Next Post

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp