युनूस तांबोळी
Ranjangaon News : रांजणगाव गणपती : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मा. बापूसाहेब गावडे माध्य- उच्च माध्यमिक विद्यालयात १६ वर्षावरील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पी एम स्किल रनमध्ये मोठा सहभाग घेतला. जवळजवळ या स्पर्धेत ३४२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेत ३४२ विद्यार्थी सहभागी
सकाळी साडेआठ वाजता टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षकृ अमोल पन्हाळकर व टाकळी हाजी चे माजी उपसरपंच अजित गावडे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी पुरुष गट आणि महिला गट असे दोन गट तयार करण्यात आले. (Ranjangaon News ) प्रत्येक गटामध्ये तीन पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी १००१ रुपये, द्वितीय साठी ७०१ रुपये, तृतीय व उत्तेजनार्थसाठी ५०१ रुपये देण्यात आली. सर्व पारितोषिके अजितदादा गावडे युवा मंचच्या वतीने देण्यात आली.
या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमाक अजित अनंत गुद्दे, व्दितीय क्रमांक पवन गीताराम गावडे, तृतीय क्रमाक सचिन कैलास गावडे त्याचप्रमाणे महिला गटात प्रथम क्रमांक मुजावर मुस्कान अंबीर , द्वितीय क्रमांक. काळे अंजली भालचंद्र, तृतीय क्रमांक हवालदार तमन्ना पिरमोहम्मद यांना मिळाले. (Ranjangaon News ) त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषक साबळे प्रियांका सोमनाथ यांना मिळाले.
दरम्यान, विशेष म्हणजे प्रियंका साबळे ही विद्यार्थीनी यापूर्वी फ्रान्स मध्ये झालेल्या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाली होती. (Ranjangaon News ) ही स्पर्धा योग्य पद्धतीने यशस्वी करण्यासाठी टाकळी हाजीचे माजी उपसरपंच तुकाराम उचाळे, डोंगरगणचे चेअरमन प्रशांत चोरे,पै स्वप्निल गावडे, सनी गावडे ,सौरव रासकर, संस्कार मुंजाळ ,ज्ञानेश गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
सर्वात शेवटी झालेल्या सभेत विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पै तुकाराम उचाळे, प्रशांत चोरे आणि प्राचार्य गावडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या. (Ranjangaon News ) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निचित डी.एम्.यांनी केले
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात चोरी करणाऱ्या तिघांना बेड्या, १५ गुन्हे उघडकीस