शेरखान शेख
Ranjangaon News : रांजणगाव गणपती : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नामांकित कंपनीचे बनावट लेबल सुमार दर्जाच्या कपड्यांना लावून, अव्वाच्या सव्वा किमतीत ग्राहकांना विकणाऱ्या ब्रँड वर्ल्ड व टॉप ७ या दोन दुकानांमध्ये ब्रँड प्रोटेक्टस इंडिया लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांनी छापे टाकत, लाखो रुपयांचे कपडे जप्त केले. याप्रकरणी शब्बीर युसूफ तांबोळी व अनिकेत आदिनाथ गायकवाड या दोघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कपड्यांच्या दुकानाचे मोठे जाळे निर्माण झालेले असताना, काही ठिकाणी नामांकित कंपनीचे लेबल व ट्रेडमार्क बनावट व हलक्या दर्जाच्या कपड्यांना लावून विक्री केली जात असल्याची माहिती ब्रँड प्रोटेक्टस इंडिया लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. (Ranjangaon News) त्यांनतर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरातील ब्रँड वर्ल्ड तसेच चाकण चौक येथील टॉप ७ या दोन्ही दुकानांत जाऊन अचानकपणे छापे टाकले. त्यावेळी त्यांना दोन्ही दुकानांत नामांकित कंपनीच्या नावाने बनावट ट्रेडमार्क व लेबल हलक्या दर्जाच्या कपड्यांना लावून ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जप्त करत, महेंद्र सोहन सिंग (वय ३६ वर्षे, रा. बिरोलीया परवा, ता. पाली, जि. पाली, राजस्थान) यांनी (Ranjangaon News) शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर तळेगाव रोड येथील ब्रँड वर्ल्ड दुकानाचे संचालक शब्बीर युसुफ तांबोळी (वय २७ वर्षे, रा. करंजेनगर, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. मढेवडगाव, ता. शिरुर, जि. पुणे) व चाकण चौक येथील टॉप ७ दुकानाचे संचालक अनिकेत आदिनाथ गायकवाड (रा. कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत सेवाधाम विद्यालयाचे यश
Ranjangaon News : लाल बहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्याची शास्त्रीजींना अनोखी आदरांजली
Ranjangaon News : कारेगावात महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल