Rajgurunagar News : राजगुरुनगर : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अघोरी अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा खेळ सुरूच आहे. अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या देखील वाढती असल्याचे गेल्या काही महिन्यांत घडलेल्या प्रकरणांवरून निदर्शनास येत आहे. नुकताच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. रेटवडी (ता. खेड) येथील वैकुंठ स्मशानभूमीत हे अघोरी कृत्य करण्यात आले. सोमवारी अमावस्येच्या रात्री हा भितीदायक प्रकार घडला.
कारवाईची मागणी
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, असे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अघोरी कृत्य करून समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन, अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत. (Rajgurunagar News) अशातच रेटवडी (ता खेड ) येथील वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी अमावस्येच्या दिवशी गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, अघोरी कृत्य करून तुमच्या समस्यांवर उपाय योजणार, असे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत.(Rajgurunagar News) त्यामुळे गावात भीतीचे सावट आहे. पोलिसांनी याचा योग्य प्रकारे शोध घेऊन, असा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रेटवडीचे माजी सरपंच दिलीप पवळे व ग्रामस्थांनी केली आहे.