-बापू मुळीक
सासवड : गोंदिया येथे (ता. 20 ते 22 सप्टेंबर) दरम्यान होणाऱ्या 43 व्या राज्यस्तरीय कनिष्ठ गट (16 वर्षाखालील) बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघांचे नेतृत्व म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथील खेळाडू राज घाडगे आणि स्वरा इनामके यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
ता. 15 सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमधून निवड झालेल्या पुणे ज़िल्हा संघांची निवड जिल्हा संघटनेचे सचिव धुंडीराज गोसावी यांनी जाहीर केली. जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे –
मुले – राज घाडगे ( कर्णधार ), शंभूराजे जगताप, विनायक विसलावत, वरद गायकवाड, वेदांत गिते, कुणाल कुंजीर, विवेक टेकावडे, सार्थक कारंडे, वेदांत जाधव, स्वराज खोमणे, संजय महाजन ( मार्गदर्शक ), कांतीलाल कोलते ( व्यवस्थापक )
मुली – स्वरा इनामके ( कर्णधार ), प्रथा जैन, अनुष्का वाघमारे, सई जगताप, सानिका दोरगे, ईश्वरी राक्षे, हिंदवी लोखंडे, प्रणाली बारते, समृद्धी टेकवडे, प्रणिती राणे, गौरी रेवाळे ( मार्गदर्शक ) कौरवी शीतकल (व्यवस्थापिका )