Railway News : पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत पुणे-लोणावळा तिसर्या, चौथ्या मार्गिकेसाठी 50 टक्के निधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाची निधीची अडचण सुटली असून, आता भूसंपादनाच्या कामालादेखील वेग वाढणार आहे.
निम्मा खर्च पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका उचलणार
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयप्रक्रियेत हा प्रकल्प अडकला होता. आता मात्र निधी देण्यात येणार असल्याने आणि राज्य शासनाचा निधी देण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे बर्याच वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचा वेग आता वाढणार आहे.
पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पुणे-लोणावळा तिसर्या, चौथ्या मार्गिकेचे काम 2013-14 पासून रखडलेले आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे निम्मा खर्च करणार असून, निम्म्या खर्चाचा वाटा राज्य सरकार आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी उचलायचा आहे. (Railway News) रेल्वेने बजेटमध्ये या प्रकल्पाचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकार, रेल्वे, महारेलच्या अधिकार्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या वेळी एमआरव्हीसीचे सीएमडी सुभाष गुप्ता, विलास वाडेकर, बी. के. झा, रुता चिग्सन, रेल्वेचे सुरेश पाखरे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
आणि चौथ्या ट्रॅकचे काम महारेलच्या माध्यमातून करावे. तिसर्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. (Railway News) त्या वेळी जोपर्यंत राज्य सरकार सहमती देणार नाही. तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. ट्रॅकसाठीचा राज्य सरकारचा सहभाग पूर्ण देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Railway news : पुणे रेल्वे स्थानकावरील ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई
Railway News | रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये होणार वाढ…