बापू मुळीक
सासवड : नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवतीर्थ चौक सासवड या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यापूर्वी तालुका युवक काँग्रेसची बैठक घेण्यात आली, त्यानंतर सदरचे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी एहसान खान, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी सुजान मीना, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पुरंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन महाजन, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय टिळेकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष अभिषेक भालेराव, युवक प्रवक्ते सुरज गदादे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मोबीन बागवान, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अवधूत रणनवरे, सासवड युवक अध्यक्ष तुषार जगताप, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस राहुल चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अभिजीत जगताप, मार्केट कमिटीचे संचालक विक्रम दगडे, नगरसेवक सागर जगताप, दत्ताराजे शिंदे, अक्षय कटके, दीपक म्हेत्रे, विकास इंदलकर, अक्षय उसळ, अक्षय बोरकर, स्वप्निल काळे, साईनाथ कोलते, हनुमंत टेकवडे, शुभम भोसले, नितीन निगडे, दत्ता लिंभोरे, विकास बापू कामथे, स्वप्निल काळे, ऋषिकेश जगताप, शुभम खेंगरे, बाबू रिटे, सतीश काळे, बाळासाहेब कुंजीर, महेश कदम, शितल चोरमले, सोमनाथ कामठे, ऋषी नाझिरकर, अनिकेत शिंदे, रईस शेख, संदेश कोलते, विराज गायकवाड, उमेश देशमुख, विशाल कांबळे, संतोष पवार यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.