पुणे: शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि मेट्रो विकास प्राधिकरणाने १० नवीन डबल-डेकर उड्डाणपूल बांधण्याची योजना जाहीर केली आहे. या उड्डाणपूलांची रचना अद्वितीय असणार आहे, खालचा रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी आणि वरचा रस्ता मेट्रो रेल्वेसाठी असणार आहे. या योजनेंतर्गत जागेचा कार्यक्षम वापर होईल आणि वाहतूक व्यवस्था सुधारेल. उड्डाणपूल हे प्रमुख चौक आणि रस्त्यांवर असणार आहे. मुंढवा महात्मा फुले चौक, काळूबाई चौक,दांडेकर पुल चौक, वाघोली आव्हाळवाडी चौकसह अनेक भागांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी पीएमसी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सहकार्य करण्यात येणार आहे.
जाणून घ्या, अजून कोणत्या ठिकाणी पूल बांधणी केली जाण्याची शक्यता
– वारजे आंबेडकर चौक
– कोथरूड बस डेपो
– गोळीबार मैदान चौक
– विमान नगर चौक
– फातिमानगर चौक
– मांजरीतील रविदर्शन
पुण्यातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर चिंता बनली आहे. प्रस्तावित डबल-डेकर उड्डाणपुलांचा उद्देश जागेचा कार्यक्षम वापर करून या समस्येचे निराकरण करणे आहे . या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पीएमसी आणि मेट्रो विकास प्राधिकरण एकत्रितपणे काम करत आहेत. पूर्ण झाल्यानंतर, हे उड्डाणपुले प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करतील, सार्वजनिक वाहतुकीला चालना देतील आणि पुण्यातील एकूण वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे. डबल-डेकर उड्डाणपुलांसारखे नाविन्यपूर्ण उपाय स्वीकारून पुणे महानगर पालिकेचे वाढत्या वाहतूक आव्हानांना तोंड देण्याचे उद्दिष्ट आहे.