Pune Weather: पुणे: महाराष्ट्रात 3 जानेवारी 2026 रोजी हवामान कोरडे ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मुंबईसह कोकण विभागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आता राज्यातील हवामान हळूहळू स्थिर होत आहे. बहुतांश भागांत पावसाची शक्यता कमी असली तरी काही विभागांत हवामान (Weather) बदलते राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात थंडीचा जोर कायम राहणार असून, विशेषतः सकाळी आणि रात्री गारवा अधिक जाणवेल.

हेही वाचा- पुणे रिंगरोडचं मिशन 2027! 20% काम फत्ते; वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी ‘डेडलाईन’ ठरली
पुण्यातील हवामान कसे राहिल?
पश्चिम महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण दिसून येईल. सकाळी थंडी आणि हलके धुके जाणवण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. काही भागांत हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही, मात्र एकूण हवामान कोरडेच राहील. पुण्यात आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याकडून इशारा
एकूणच जानेवारीच्या सुरुवातीला राज्यात थंडी आणि अवकाळी पावसाचा मिश्रित परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. तापमानात पुढील काही दिवसांत 2 ते 3 अंशांची चढउतार होण्याची शक्यता असली तरी थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे.





