Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tamhini Ghat Accident: भीषण अपघात..! ताम्हिणी घाटात कार कोसळली, पुण्यातील तरुणाचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 January 2026, 8:51

Tamhini Ghat Accident: नवी मुंबई: ताम्हिणी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. काही आठवड्यांपूर्वी पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झालेल्या ठिकाणाजवळच मंगळवारी आणखी एका वाहनाचा अपघात झाला. माणगाव हद्दीत हुंडई ऑरा ही कार खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ताम्हिणी घाटातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Tamhini Ghat Accident)

 

मंगळवारी दुपारच्या सुमारास ही कार ताम्हिणी घाटातून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट सुमारे 700 ते 800 मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कार पूर्णपणे चिरडली गेली. दरी अतिशय खोल आणि दुर्गम असल्याने बचाव कार्यात अडचणी आल्या. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकांनी ड्रोनच्या मदतीने वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला.

या अपघातात शुभम असे मृत चालकाचे नाव असून तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुभम हा गाडी चालवत असताना अपघातग्रस्त झाला आणि वाहनाच्या तुटलेल्या अवशेषांमध्ये अडकून पडला होता. त्याला वाचवणे शक्य झाले नाही. अपघातानंतर त्याचा मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी दरीतून बाहेर काढण्यात आला.

माणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी सांगितले की, शुभम हा पुण्याहून येत होता. तो नेमका कुठे जात होता आणि अपघात कसा झाला याबाबत सध्या स्पष्ट माहिती मिळालेली नाही. संबंधित कारकडे पर्यटन परवाना असल्याने तो ड्रायव्हिंग व्यवसाय करत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

ताम्हिणी घाटात यापूर्वीही अशा अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अरुंद रस्ते, तीव्र वळणे आणि सुरक्षिततेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. या घटनेनंतर घाटातील वाहतूक सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune News: पुण्यात नायलॉन मांजाचा उच्छाद; एकापाठोपाठ 4 महिलांचे गळे कापले, नागरिकांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.