Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 18:40

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मृत तरुणाचे नाव विशाल भैरम काळे (वय 21, रा. हुडको कॉलनी, शिरूर) असे आहे. याप्रकरणी चैत्राली ऊर्फ चैतू चंदू भोसले, रोहित चंदू भोसले, ऋषिकेश चंदू भोसले, कोला काळूराम काळे आणि परशान काळूराम काळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल आणि आरोपी हे परस्पर नातेवाईक आहेत. ते कोरेगाव पार्क सिग्नल परिसरात फुले आणि इतर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत होते. विशालचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या संबंधांवरून आरोपींकडून त्याला वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

तक्रारीनुसार, आरोपींनी विशालकडे पैशांची मागणी केली होती. तसेच त्याला मारहाण करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे विशाल तणावाखाली होता. अखेर 1 जून रोजी रात्री त्याने कोरेगाव पार्क परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेनंतर मृताच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार आरोपींच्या छळाला कंटाळून विशालने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वनवे करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

La Plateforme de Jeux en Ligne auquel les Joueurs Français Peuvent Vraiment Faire Confiance : Slotoro Casino

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.