Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! वादग्रस्त उद्योजक राणा सूर्यवंशीची Y+ सुरक्षा कायम; राणा सोडून विद्यानंद बापटांसह अनेकांची Y + सुरक्षा हटवली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 October 2026, 15:15

पुणे : पुणे शहरात पोलीस संरक्षणाबाबत विशेष शाखेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 23ऑक्टोबर रोजी पोलीस उपआयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संरक्षण समितीच्या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर 24 ऑक्टोबरला जारी केलेल्या पत्रानुसार, शहरातील 25 हून अधिक प्रसिद्ध आणि व्यावसायिक व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे.

विशेष शाखेने घेतलेल्या या निर्णयानुसार अनेक उद्योजक, वकील आणि संस्थाप्रमुखांची सुरक्षा मागे घेण्यात आली आहे. यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला, पुनीत बालन, अजिंक्य डी. वाय. पाटील, मिशेल योहान पुनावाला आणि योहान झवेरी पुनावाला यांचा समावेश आहे. तसेच राजकीय विश्लेषक तेहसीन पुनावाला, चित्रपट निर्माते मिहिर कुलकर्णी, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सरहद संस्थेचे संजय नहार, कोरेगाव भीमा प्रकरणाचे वकील आशिष सातपुते आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांची सुरक्षा काढण्यात आली आहे.

तर काही व्यक्तींचे संरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय झाला आहे. बारामती विमानतळाजवळील हल्ल्यानंतर चर्चेत आलेला आणि सध्या फरार असलेला उद्योगपती राणा सूर्यवंशी याचे ‘वाय प्लस एस्कॉर्ट’ दर्जाचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पुरवण्यात आलेली ‘1+1’ सशस्त्र पोलीस आणि एस्कॉर्ट वाहनाची सुरक्षा देखील जैसे थे ठेवण्यात आली आहे.

पुणे पोलीस दलाची विशेष शाखा दर एक ते दोन महिन्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आणि व्यक्तींना असलेल्या धोक्याचा आढावा घेते. या पाहणीनंतर गरज आणि तीव्रतेनुसार सुरक्षा वाढवणे, कमी करणे किंवा ती काढून घेण्याचा निर्णय घेतला जातो. 25 हून अधिक लोकांचे संरक्षण अचानक रद्द झाल्याने पुणे शहरात या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे गिफ्ट! महागाई भत्ता थेट ६३ टक्क्यांवर; १ जुलैपासूनचा एरियसही थेट खात्यात जमा होणार

Wednesday, 28 October 2026, 17:30

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Wednesday, 28 October 2026, 16:35

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16
Next Post

अहिल्यानगरच्या ग्रामपंचायत कार्यालयात भरदिवसा महिलेचा मर्डर! १० वर्षांचं प्रेम, चारित्र्यावर संशय अन् बॉयफ्रेंडने केले चाकूने सपासप वार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp