Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 28 October 2026, 17:31

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यातही त्यांनी मोठी आघाडी कायम ठेवली. शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर असून, दोघांच्या मतांमध्ये ६ हजार ७७० मतांचा फरक आहे. तिसऱ्या क्रमांकावरील दत्तात्रय सावंत हे स्पर्धेतून बाद झाले. विजयाची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी असतानाच कौस्तुभ गावडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

‘आई अंबाबाईला स्मरून सांगतो, हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे,’ अशा शब्दांत गावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्यास सुरुवात केल्यापासून आपले आयुष्य शिक्षकांसाठी समर्पित केले असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करताना महाराष्ट्रातील सर्वात तरुण विधानपरिषद सदस्य होण्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत गावडे म्हणाले की, मतमोजणीची शेवटची फेरी बाकी असली तरी मिळालेल्या मताधिक्यामुळे विजयाबाबत विश्वास वाटत आहे. आतापर्यंत आपण कोणत्याही टीकेला उत्तर दिले नाही आणि पुढेही टीकेला प्रत्युत्तर देण्याऐवजी आपल्या कामातून उत्तर देणार आहोत. आपल्या वयावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते; मात्र शिक्षकांनी मतदानातून त्याचे उत्तर दिले आहे. आगामी काळात कामाच्या माध्यमातून वयाबाबत उपस्थित होणाऱ्या शंकांना दूर करेन, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीत आपण कोणाचाही पराभव केला, असे म्हणणार नसल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. हा सुज्ञ शिक्षकांचा मतदारसंघ असून, सर्वांना सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून काम करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. या जिल्ह्यातून अनेक शैक्षणिक क्रांती घडल्या आहेत. त्याच धर्तीवर सर्व शिक्षकांसाठी काम करायचे आहे. यापूर्वीच्या आमदारांकडून झालेल्या चुका पुन्हा होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

निवडणुकीत पैसे वाटप केल्याचा आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत गावडे यांनी या आरोपांवर प्रश्न उपस्थित केला. २३ तारखेला मतदान झाल्यानंतर आता आरोप का केले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. आपल्याला २३ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारासोबत ६ हजार ७७० मतांचे अंतर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी तीन जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण आणि स्मिताताईंनी प्रचार केला. मात्र, मतदारांनी दिलेला कौल स्वीकारणे आवश्यक आहे. काही जागांवर मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. हा निकाल मान्य करून वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुकीत संबंधित जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू, असे गावडे म्हणाले.

कौस्तुभ गावडे यांच्या विजयानंतर कोल्हापुरातील त्यांच्या कार्यालयासमोर समर्थकांनी जल्लोष केला. वयाच्या तिसाव्या वर्षी ते शिक्षक आमदार झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनीही आनंद साजरा केला.

काही महिन्यांपूर्वीच कौस्तुभ गावडे यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या क्षणी आईची आठवण काढताना पत्नी मयुरी गावडे भावुक झाल्या. आज कौस्तुभ आमदार झाल्याचे पाहण्यासाठी आई हवी होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे गिफ्ट! महागाई भत्ता थेट ६३ टक्क्यांवर; १ जुलैपासूनचा एरियसही थेट खात्यात जमा होणार

Wednesday, 28 October 2026, 17:30

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Wednesday, 28 October 2026, 16:35

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16
Next Post

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp