Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 20:58

बारामती : बारामती परिसरात एका 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीशी मोबाईलवर संपर्क ठेवल्याच्या संशयातून दोन जणांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, अपहरण झालेल्या तरुणाने प्रसंगावधान राखत आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पाठलाग करून दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ओंकार प्रकाश भोसले (वय 27) आणि तन्मय सुधीर साळुंखे (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी 6 जून रोजी सायंकाळी त्यांनी ऋषिकेश नावाच्या तरुणाला सुपा-मोरगाव मार्गावरील एका हॉटेलजवळ बोलावले. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवून पुण्याच्या दिशेने नेण्यात आले.

प्रवासादरम्यान आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला. पुढे दिवेघाट परिसरात नेऊन त्याला मारहाण करण्यात आली. मात्र, अंधाराचा फायदा घेत ऋषिकेश आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने मित्रांशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

 

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले. जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. मोबाईल कॉलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयितांचे ठिकाण दिवेघाट परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी सासवड पोलिसांच्या मदतीने झेंडेवाडी परिसरात आरोपींच्या स्विफ्ट कारला अडवून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Special Rewards While Staying in Charge at Lotto Casino in New Zealand

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.