पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचा प्रवास दुपटीने महागला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीत दैनंदिन पास ४० ऐवजी ७० रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत १२०ऐवजी १५० रुपयांना, तर मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये इतका महागला आहे.सन २०१४नंतर प्रथमच दरवाढ झाली आहे. त्यानुसार किमान तिकीट दहा रुपये असणार आहे. वाढलेल्या दरामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
दरम्यान पीएमपीच्या तिकिट मशिन आणि अन्य यंत्रणांमध्ये बदल केल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत नवे तिकीट दर लागू होतील.
किलोमीटरच्या अंतराने सहा टप्पे, तर त्यापुढील ३० ते ८० किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटरच्या अंतराने पाच टप्पे अशा एकूण ११ टप्प्यांमध्ये नवीन तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठीच्या पास दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘पीएमआरडीए’च्या मासिक पासचा दरही कायम आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लवकरच एक हजार बसची खरेदी करणार आहे. यापैकी पाचशे बस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, तर पाचशे बस पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्वतंत्रपणे खरेदी करणार आहे, असा निर्णय मंगळवारी पीएमपीच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला