पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना हाती घेतली आहे. गुंडांना पकड़ा आणि बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे.
कोयता गॅगच्या गुंडांनी तर घुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यात पोलिसांना अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी योजना सुरू केली आहे.
दरम्यान, पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाई केल्यास बक्षीस स्वरूपात काही रक्कम देण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तानी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणारी बक्षिसे पुढीलप्रमाणे :
१) शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार कारवाई केल्यास १० हजार रुपये
२) शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार कारवाई केल्यास ३ हजार रुपये
३) फरार आरोपीला पकडल्यास १० हजार रुपये
४) पाहिजे आरोपीला पकडल्यास ५ हजार रुपये
५) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि. मोका कारवाई केल्यास ५ हजार रुपये
६) महा धोकादायक व्यक्ती इ. चे विघातक कृत्यांना आळा घालणाच्या ५ हजार रुपये
७) महा पोलीस कायदा कलम ५५ नुसार कारवाई केल्यास दोन हजार रुपये
८) महा पोलीस कायदा कलम ५६/५७ नुसार कारवाई केल्यास १ हजार रुपये